शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By admin | Updated: February 22, 2017 23:30 IST

येवला : आवर्तनातून चारीवरील पाणीवापर संस्थांना पाणी देण्याची मागणी

येवला : पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्रमांक ३८ व ३९ वरील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना पाण्याचा कोटा मिळाला नसल्याने सदरचा कोटा मिळावा, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पालखेड कार्यालयाचे लिपिक डी.व्ही. शेवाळे यांच्याकडे देण्यात आले. दुसरे आवर्तन चालू झाल्यानंतर चारी क्र. ३८ ते ४५ पर्यंतच्या सर्व चाऱ्या या एकत्रित चालू होतात. पाटाचे पाणी डोंगळे टाकून उचलले जात असल्याने पाणी कमी प्रमाणात होते. त्यामुळे चारी क्रमांक ३८  व ३९ या बंद ठेवण्यात आल्या  होत्या. ज्यावेळी चारीला पाणी सोडण्यात आले, तेव्हा ते कमी प्रमाणात चालू होते. त्यात चारीच्या मुखाशी काही शेतकऱ्यांनी बांध फोडल्याने थोडे फार सुरू असणारे पाणी बंद झाले. यामुळे काही भागात चारी ओलीदेखील झाली नाही.  पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी चोरीला जात असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे अन्यथा उपोषणास बसण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.  निवेदन देते वेळी रंगनाथ भोरकडे, राजेंद्र वाणी, जयराम  मोरे, संदीप खैरनार, दादासाहेब तनपुरे, अशोक शिंदे, यशवंतराव शिंदे, संजय शिंदे, शंकरराव कदम, अमोल शिंदे, राजेंद्र काळे, ज्ञानेश्वर कटके, श्रावण बेंडके, दीपक गायकवाड, माधव देशपांडे, भय्यासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, शरद शिंदे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)