येवला : तालुक्यातील जायदरे येथील शेतकरी जयराम बाजीराव शेजवळ (६०) यांनी शेती पिकावरील कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतजमिनीच्या कर्जाला कंटाळून व शेतजमिनीच्या वादातून आत्महत्या करीत असल्याचे शेजवळ यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}