शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ की प्रशासकीय राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:43 PM

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे

ठळक मुद्देजिल्हा परिषदेपुढे पेच : प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्यानंतर नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणूक घेण्यात येणार असली तरी, या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणाºया कालावधीत जिल्हा परिषदेचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे. एकतर विद्यमान पदाधिकाºयांना मुदतवाढ द्यावी किंवा प्रशासकीय राजवट लावावी असे दोनच पर्याय समोर आले आहेत. त्यातही सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरू होत असल्यामुळे शासनाकडून राजकीय निर्णय होण्याची व त्यातून विद्यमान पदाधिकाºयांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिका-यांची अडीच वर्षांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना नुकतीच संपलेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष, पदाधिका-यांची निवडणूक घेणे तत्कालीन सरकारला धोकादायक वाटले. त्यामुळे विद्यमान पदाधिका-यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचे स्मरण राज्याच्या ग्रामविकास विभागाने करून दिले असून, त्यानुसार २० डिसेंबरनंतर कधीही नवीन पदाधिका-यांची निवड घेण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाने निश्चित करून देणे अपेक्षित असताना त्यांनी निव्वळ जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देऊन योग्य ती यथोचित कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मुळात राज्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांची मुदत एकाच वेळी संपुष्टात येऊन नवीन अध्यक्ष व पदाधिकाºयांची निवडणूक घेण्यात येणार आहे. अशा वेळी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी राबविला जाणे अपेक्षित आहे. मात्र यासंदर्भात ग्रामविकास विभागाने त्या त्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांवरच ही जबाबदारी सोपविली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद