शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिकीकरणातही सफाई कामगारांचे शोषण : खैरालिया

By admin | Updated: October 21, 2016 02:12 IST

जागतिकीकरणातही सफाई कामगारांचे शोषण : खैरालिया

 नाशिक : जागतिकीकरण झाल्यानंतरही सफाई कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण संपलेले नाही. कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्त करून आणि किमान वेतन न देता त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे मत सफाई कामगारांच्या जीवनाचे अभ्यासक जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेंतर्गत स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने जगदीश खैरालिया यांचे व्याख्यान संपन्न झाले. हुतात्मा स्मारकात व्याख्यानमालेचे ३५ वे पुष्प त्यांनी ‘जागतिकीकरण आणि सफाई कामगारांची सद्यस्थिती’ या विषयावर गुंफले. व्यासपीठावर स्वातंत्र्य सैनिक पंडित येलमामे आणि वसंतराव हुदलीकर उपस्थित होते.जागतिकीकरणाने अनेक परिमाणे बदलली आहेत. शेषाच्या फणावर उभी असलेली पृथ्वी अशा परंपरावादी विचारांना अण्णा भाऊ साठे यांनी फाटा देत पृथ्वीही श्रमिकांच्या हातावर उभी असल्याचे सांगितले होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या क्रांतीनंतर पृथ्वीही संगणकाच्या पडद्यावर असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व आभासी जग असून त्यावरच सध्या धोरणे ठरविली जात असल्याचे खैरालिया यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली अशा विविध राज्यांचा आणि ठाण्यातील चारशे सफाई कामगारांच्या कुटुंबीयांच्या केलेल्या अभ्यासाच्या आधारे निष्कर्ष मांडताना खैरालिया यांनी सफाईच्या कामात १० ते १२ टक्के ओबीसी सोडले तर बाकी दलित आहेत. तुंबलेल्या गटारींमध्ये त्यांनाच उतरावे लागते. याचे कारण ही जातीय रचनाच जोपासली जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तळातील सफाई कामगार काम करतो, मात्र त्याचे श्रेय संबंधित शहरांचे महापौर, शहराध्यक्ष घेत असतात. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी कारखान्यांमध्ये सफाई कामगार कंत्राटी असून, आवश्यकतेनुसार पदे भरली जात नाही. शासनाने किमान वेतन कायद्यात सुधारणा केल्यानंतर पंधरा हजार रुपये वेतनाऐवजी तीन ते आठ हजार रुपये दिले जातात, असेही ते म्हणाले. यावेळी समाधान भारतीय यांनी परिचय करून दिला. पंडितराव येलमामे यांनी मनोगत व्यक्त केले, तर अशोक राबडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)