शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सांडपाणी प्रक्रीया केंद्रांवर ओझोनायझेशनचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:08 IST

नाशिक- गोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडपाणी प्रक्रीया केंद्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.२२) या संदर्भात नागपुर येथील एका कंपनीच्या संचालकांनी या दोन्ही प्रक्रीया केंद्राची पहाणी केली. 

ठळक मुद्देतज्ज्ञांकडून पाहणी बीओडीत सुधारणा करण्याचा प्रयत्न

नाशिकगोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडपाणी प्रक्रीया केंद्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.२२) या संदर्भात नागपुर येथील एका कंपनीच्या संचालकांनी या दोन्ही प्रक्रीया केंद्राची पहाणी केली. 

गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी नियुक्त केलेल्या महापालिकेच्या उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात या विषयावर चर्चा करण्यात आली होती. महापालिकेच्या सध्याेच्या सांडपाणी प्रक्रीया केंद्राचे आधुनिकीकरण करून बीओडी दहाच्या आत आणण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने तयारी केली असली तरी त्यासाठी खर्च देखील येेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर लागणारा खर्च आणि वेळ बघता थेट प्रक्रीया केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यामुळे बीओडी मर्यादीत राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२२) कंपनीच्या संचालक आणि याचिकाकर्ता राजेश पंडित यांनी ही पाहणी केली. त्यानंतर महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावाडे यांच्याकडे बैठक देखील झाली. कंपनीने रीतसर पत्र देऊन महापालिकेची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरवले.

दरम्यान, उपसमितीच्या बैठकीत देखील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या सर्व इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टींग करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्याच प्रमाणे स्मार्ट सिटीच्या वतीने प्रोजेक्ट गेादा अंतर्गत सुरू असलेले काम पहाण्यासाठी आर्किटेक्ट प्राजक्ता बस्ते यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. त्याच प्रमाणे गोदावरती प्रदुषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाेलीस पथक नियुक्त करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीpollutionप्रदूषण