शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

८२१ उमेदवारांकडून सात कोटी ७० लाखांचा खर्च

By admin | Updated: April 28, 2017 02:02 IST

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८२१ उमेदवारांकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याचा हिशेब सादर झाला आहे.

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८२१ उमेदवारांकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याचा हिशेब सादर झाला आहे. महापालिकेलाही सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सुमारे ३.५० कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. या साऱ्या खर्चाबाबतचा अहवाल महापालिकेने विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.२१ फेब्रुवारी २०१७ रोजी नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांसाठी मतदान घेण्यात आले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या निवडणूक प्रक्रियेत एकूण ८२१ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी १० लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती याशिवाय, निवडणूक कालावधीत होणाऱ्या खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक केले होते. आयोगाने यंदा तर निवडणूक खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बॅँक खाते उघडण्यास सांगितले होते. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन राजपत्रात नूतन नगरसेवकांची नावे समाविष्ट झाल्यानंतर आयोगाने सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याकरिता व त्याबाबतचे विवरण देण्यासाठी महिनाभराची मुदत दिली होती. त्यानुसार, १५ उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर केला. एकूण ८२१ उमेदवारांनी सादर केलेल्या विवरणपत्रानुसार, निवडणुकीत ७ कोटी ७० लाख ७३ हजार ५१३ रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही निवडणुकीसाठी प्रभावी यंत्रणा राबविली. महापालिकेने निवडणुकीसाठी सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. त्यापैकी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीचे कामकाज पूर्णत्वाला गेल्याने मुख्य लेखापरीक्षकांकडून विभागीय आयुक्तांना अहवाल रवाना करण्यात आला असून, निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)