शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

संदीप फाउंडेशनमधील घटना : सुमारे अडीच महिन्यांनी कारवाई

By admin | Updated: April 27, 2015 23:41 IST

खुनातील फरार जाधवला अटक

नाशिक / त्र्यंबकेश्वर : संदीप फाउंडेशनमधील विद्यार्थी रवींद्र बोरसे (वय २४, कार्तिकनगर, कामटवाडा, सिडको) या विद्यार्थ्याच्या खुनातील प्रमुख व फरार संशयित किरण जाधवला सोमवारी (दि़२७) त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सोमेश्वर परिसरातून अटक केली़
घटनेच्या दिवसापासून फरार असलेला व पकडण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या निक्रियपणाबद्दल नानासाहेब बोरसे यांनी मार्च महिन्याच्या अखेरीस ग्रामीण पोलीस अधीक्षक व त्र्यंबकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले होते़ दरम्यान, जाधवला न्यायालयात हजर केले असता १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
१६ फेबुवारी २०१५ रोजी त्र्यंबकेश्वररोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये ट्रॅडिशनल डेचे सेलिब्रेशन सुरू होते़ सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन गटांतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या़ त्यावेळी संशियत किरण जाधव (रा. आनंदवल्ली) आणि दिव्येश आवारे (रा. गंगापूर रोड) हे दोघे महाविद्यालय आवारात तलवार व धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवित होते़ या दोघांनीही वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या बोरसेला उपचारासाठंी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित दिव्येश आवारे व आकाश निगळ या दोघांना अटक केली़ सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने नामंजूर केला आहे़; मात्र घटनेनंतर प्रमुख संशयित किरण नामदेव जाधव हा फरार झाला होता़ एका राजकीय पुढाऱ्याच्या आश्रयाने संशयित किरण जाधव हा राजरोसपणे शहरात फिरत असून, त्याचे नातलग धमकी देत असल्याचे निवेदन मयत रवींद्र बोरसेचे वडील नानासाहेब बोरसे यांनी ३१ मार्चला ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे दिले होती़ यानंतर सक्रिय झालेल्या पोलिसांनी सोमवारी जाधवला अटक केली़ (प्रतिनिधी)