शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

तापमान वाढतेय; उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी ओव्हरहीटिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टी नक्की करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:25 IST

नाशिक: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) आग लागणे, बॅटरीचा स्फोट होणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून ...

नाशिक: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) आग लागणे, बॅटरीचा स्फोट होणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच इंदूर येथे ईव्ही कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर ईव्ही वापरणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक झाले आहे.

जिल्ह्यात दीड लाख ईव्ही; दुचाकींचा सर्वाधिक भरणा

नाशिक जिल्ह्यात सध्या सुमारे १.५ लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे असून, स्वस्त पर्याय आणि इंधन बचतीमुळे नागरिकांचा कल ईव्हीकडे वेगाने वाढत आहे. मात्र, वाढत्या संख्येसोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

बॅटरी स्फोट आणि शॉर्टसर्किटच्या घटनांमध्ये वाढ

अलीकडील काळात बॅटरी ओव्हरहिट होणे, खराब वायरिंग किंवा निकृष्ट दर्जाच्या चार्जिंग उपकरणांमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी बॅटरीचा स्फोट झाल्याच्या गंभीर घटनादेखील समोर आल्या आहेत, ज्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची घ्या 'अशी' काळजी! ईव्ही चार्जिंग करताना पाळायचे महत्त्वाचे नियम

 तुमची दुचाकी किंवा कार चार्ज करताना खालील गोष्टींची काळजी घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे:

  • चार्जिंग नेहमी हवेशीर आणि थंड जागेत करा.

  • बॅटरी गरम असल्यास ती लगेच चार्जिंगला लावणे टाळा.

  • चार्जिंग सुरू असताना वाहनाकडे दुर्लक्ष करू नका.

  • कारसाठी नेहमी अधिकृत आणि प्रमाणित चार्जिंग स्टेशनचाच वापर करा.

रात्रभर चार्जिंग करणे ठरू शकते जीवघेणे

बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देणे किंवा रात्रभर चार्जिंगवर लावून ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो आणि ओव्हरहिटिंग होऊन आग लागण्याची शक्यता वाढते.

नेहमी ओरिजिनल चार्जरचाच वापर करा

वाहन चार्ज करण्यासाठी नेहमी कंपनीकडून दिलेला मूळ (ओरिजिनल) चार्जरच वापरावा. अनेकदा पॉवर एक्स्टेंशन बोर्ड किंवा कमी दर्जाच्या वायरचा वापर केल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण होतो, तो टाळणे हिताचे आहे.

थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून वाहनाचा बचाव

तुमचे ईव्ही वाहन आणि त्याची बॅटरी कधीही थेट सूर्यप्रकाशात किंवा कडक उन्हात पार्क करू नका. अत्यंत उष्णतेमुळे बॅटरीची कार्यक्षमता तर कमी होतेच, पण त्यासोबतच अपघाताचा धोकाही अनेक पटींनी वाढतो.

नियमित सर्व्हिसिंग आणि तांत्रिक तपासणी

वाहनाची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. बॅटरी, अंतर्गत वायरिंग आणि चार्जिंग पोर्ट यांची अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करून घ्यावी. नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांत ईव्ही पेटल्याच्या २० पेक्षा अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत, त्यामुळे ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

घरात बॅटरी चार्ज करताना घ्यायची खबरदारी

घरात बॅटरी चार्ज करणे सोयीचे असले तरी त्यात काही तांत्रिक धोके दडलेले आहेत. चार्जिंग करताना योग्य व्हेंटिलेशन (हवा खेळती राहणे), सुरक्षित वायरिंग आणि ओव्हरलोड टाळणे आवश्यक आहे. शक्य असल्यास घराबाहेर किंवा पार्किंगमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉईंटचा वापर करावा.

वाढत्या तापमानात इलेक्ट्रिक वाहनांची योग्य निगा राखली तरच तुमचा प्रवास सुरक्षित होईल. वरील सूचनांचे पालन करून तुम्ही संभाव्य अपघात टाळू शकता आणि आपल्या वाहनाचे आयुष्यही वाढवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Keep Your Electric Vehicle Battery Safe This Summer!

Web Summary : With rising temperatures, electric vehicle battery safety is crucial. Charge in ventilated areas, avoid charging hot batteries, and use original chargers. Prevent overnight charging, direct sunlight exposure, and ensure regular servicing to avoid overheating and accidents. Prioritize safety for a secure journey.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरSummer Specialसमर स्पेशलtechnologyतंत्रज्ञानcarकारbikeबाईक