शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

फुले, आंबेडकरांमुळे स्त्रियांचे सबलीकरण

By admin | Updated: December 26, 2016 02:44 IST

एकनाथ शिंदे : पुतळ्यांच्या अनावरणप्रसंगी प्रतिपादन

 उपनगर : महात्मा जोतिबा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत शिक्षणाची ज्ञानज्योत पोहोचली असून, शिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रियांचे सबलीकरण होत असून, देशातील महिलांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष अशी विविध महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. फुले, आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे येथील महिलांनी वैज्ञानिक, क्रीडा व कलाक्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आगरटाकळी परिसरात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हांडोरे, रिपाइं (गवई गट) अध्यक्ष राजेंद्र गवई, खासदार राजीव सातव, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, जयंत जाधव, माजी महापौर अशोक दिवे आदि उपस्थित होते. शिंदे म्हणाले, जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या न्याय हक्कांची जाणीव झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला मूलभूत अधिकार देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांनी वंचित घटकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश दिला असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजाचा विकास साधणे शक्य असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, जयंत दिंडे, शरद अहेर, शोभा बच्छाव, वंदना मनचंदा, मेघा साळवे, उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल दिवे यांनी केले. प्रशांत दिवे यांनी आभार मानले.