शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उच्चांकी ११ जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:58 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देधक्कादायक । मृत्युदर कमी होण्याऐवजी वाढच; नागरिकांत चिंता

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असून, शनिवारी (दि.११) विक्रमी ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चोवीस तासांत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून, आॅक्सिजन पुरवठ्याबरोबरच रेमिडीसीवर इंजेक्शनवर भर देण्यात येत आहेत. रेमिडीसीवर इंजेक्शन थेट मुंबईहून मागविण्यात आले आहेत.शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढतच आहे. महापालिकेने मृत्युदर कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. नियमित चाचण्या तर वाढविल्या आहेच, परंतु अ‍ॅँटिजेन चाचण्यादेखील करणे वाढविल्या आहेत. त्याचप्रमाणे उपचार पद्धतीतदेखील करण्यात आला आहे. मात्र, मध्यंतरी तीन ते चार दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या घटली आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा वाढत गेली.शनिवारी (दि.११) एकाच दिवसात ११ जणांचा बळी गेला आहे. यात मुंबईनाका येथील भाभानगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, वडाळारोडवरील जयदीपनगर येथील ७० वर्षीय वृद्ध, गंजमाळ येथील उर्दू शाळे जवळ राहणारी ६० वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील ७२ वर्षीय पुरुष त्याचबरोबर पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरातील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर टाकळी येथील भीमशक्तीनगर येथे राहणारा ७० वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील ७७ वर्षीय वृद्ध, एकलहरेरोडवरील भोर मळा परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष तसेच पंचवटीतील आरटीओ आॅफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे येथील डीजीपीनगरातील ४६ वर्षीय महिला तर सातपूर येथील शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाचादेखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.शहरात एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या १६५ झाली आहे. तर चोवीस तासात आढळले १६५ बाधित आढळल्याने ही संख्या ३ हजार ९२९ झाली आहे. अर्थात, शहरातील बाधितांच्या संख्येपैकी १ हजार ४९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर २ हजार २६४ रुग्णच कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या कोरोनाबाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात आली असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे, तर दुसरीकडे औषधांचा पुरेसा वापर करताना सध्या प्रभावी म्हणून गणल्या जाणाºया रेमिडीसीवर इंजेक्शनावर भर दिला जात आहे. सध्या या इंजेक्शनची सर्वत्र टंचाई असल्याने थेट मुंबईहून इंजेक्शन मागविले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू