लासलगावी चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:24 IST2019-12-04T14:24:18+5:302019-12-04T14:24:38+5:30

लासलगाव : येथील पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या.

 Eight bicycles seized from Lasalgavi thieves | लासलगावी चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त

लासलगावी चोरट्यांकडून आठ दुचाकी जप्त

लासलगाव : येथील पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या. पोलीस उपनिरीक्षक रामकष्ण सोनवणे , कैलास महाजन , योगेश शिंदे , पोलिस.कॉ प्रदिप आजगे यांच्या पथकाने समाधान राजु भदाणे २९ वर्ष रा. पिंपळगाव नजिक व मुकेश राजाराम वाघ (३३ वर्षे रा रेल्वेस्टेशन लासलगाव ता निफाड) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी लासलगाव पोलीस स्टेशन हददतीतुन दुचाकी चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे. त्यांचेकडुन लासलगाव पोलीस स्टेशन हददतीतुन दोन दुचाकी चोरीचे गुन्हे व नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीतील नाशिक रोड , भद्रकाली , पंचवटी पोलीस स्टेशनकडील तीन दुचाकीचे गुन्हे उघडकीस आल. त्यांच्याकडुन आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. सदर दुचाकी चोरीचा मोहरक्या पोलिसांच्या ताब्यात आला आहे.पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश सीताराम जोपळे करीत आहे.

Web Title:  Eight bicycles seized from Lasalgavi thieves

टॅग्स :Nashikनाशिक