दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

By Admin | Updated: July 30, 2014 00:19 IST2014-07-29T22:40:19+5:302014-07-30T00:19:21+5:30

दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

Due to strong rain, sowing on one lakh hectare area | दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

दमदार पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

नाशिक : पावसाने गेल्या दोन दिवसांपासून संततधार कायम ठेवल्याने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना गती आली असून, जिल्ह्यातील एकूण खरिपाच्या सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ९५ हजार २१४ हेक्टर (१५ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.
जिल्ह्यात खरिपाचे साडेसहा लाख हेक्टरच्या आसपास लागवडीचे क्षेत्र असताना जून संपूनही एक टक्का क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नव्हत्या. मात्र जुलैच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना गती मिळाली. जुलैच्या अखेरपर्यंत जिल्'ातील ९५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात भाताच्या ५१ हजार ७०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ३४४ हेक्टर क्षेत्रावर, ज्वारीच्या १८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९८ हेक्टर, बाजरीच्या दोन हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी १७ हजार ६६ हेक्टर क्षेत्र, तसेच मका पिकाचे एक लाख १९ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ३१ हजार ५६८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

Web Title: Due to strong rain, sowing on one lakh hectare area