शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

योग्य आहाराद्वारे वाढत्या उन्हावर करा मात

By admin | Updated: April 1, 2017 01:00 IST

नाशिक : सलग चार दिवसांपासून वाढते तपमान, आग ओकणारे ऊन, उकाडा यामुळे नाशिककर हैराण झाले असून, आरोग्याच्या विविध समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक : सलग चार दिवसांपासून वाढते तपमान, आग ओकणारे ऊन, उकाडा यामुळे नाशिककर हैराण झाले असून, आरोग्याच्या विविध समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण वाढत चालले असल्याने योग्य आहाराद्वारे वाढत्या तपमानाला सामोरे जावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानीकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे. (प्रतिनिधी)वाढत्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या दिवसात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे. चहा, कॉफी या दिवसात बंद करावी. दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्लू सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले खडीसाखर, धणे, बडिशोप यांचे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाब पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. - प्रा. वैशाली चौधरी,  आहारतज्ज्ञ, एसएमआरके महाविद्यालयसध्या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताची शक्यता वाढली आहे. आपले शरीर जेव्हा वाढते तपमान सहन करू शकत नाही तेव्हा ते निरनिराळ्या लक्षणांनी ते व्यक्त करत असतात. योग्य आहार घेऊन स्वत:ला फिट ठेवावे. घरातील सर्व सदस्यांनी कलिंगड, द्राक्ष, लिंबू, काकडी, आवळा, कोरफड यांचे काळे मीठ, जिरे पावडर टाकून केलेले ज्यूस प्यावे. हिरवी मिरची टाळून पाणीपुरीचे पाणी बनवून ते दिवसातून ४ ते ५ ग्लास प्यावे. १ चमचा खसखस पावडर व अर्धा चमचा गूळ हे मिश्रण लिंबूपाण्यात टाकून त्याचे प्राशन करावे. कोथंबिर, जिरे, बडिशोप हे काहीकाळ पाण्यात भिजवून ते पाणी दिवसातून २ ते ३ ग्लास प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतील. प्रत्येकाने कलिंगड, काकडी आदिंचे सेवन करावे. लिंबू पाण्यात चमचाभर तुकुमराई टाकून ते प्यावे. दररोज नियमितपणे ताक प्यावे. दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याचा प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी आवर्जून हातपाय धुवावेत. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून ती पेस्ट कपाळावर, छातीवर व कानाच्या पाळ्यांवर लावावी. - रश्मी सोमाणी, आहारतज्ज्ञसध्या खूप ऊन वाढले आहे. प्रत्येकाने दररोज कमीत कमी ५ ते ६ लिटर पाणी प्यावे. या दिवसात आंबट फळांचा वापर वाढवावा. तळलेले, अतिगोड, खूप तिखट पदार्थ अजिबात खाऊ नये. हलका आहार घ्यावा. ताक, कैरीचे पन्हे, लस्सी, उसाचा रस, नारळपाणी, कोकम सरबत, लिंबूपाणी, उसाचा रस अशी पेये आवर्जून घ्यावीत. कोल्ड्रिंक, फ्रीजमधले पाणी हे जरी क्षणभर थंडावा देत असले तरी नंतर ते शरीरात उष्ण पडतात. त्यामुळे ते टाळावे. एकदम पोटभर न जेवता थोड्या थोड्या वेळाने खावे हलका आहार घ्यावा. जेवणात कच्चा कांदा, कैरी, टोमॅटोच्या चकत्या, काकडी अशा सॅलडसचा वापर वाढवावा. या साऱ्यांमुळे उन्हाळा सुकर होऊ शकतो.- रंजिता शर्मा, आहारतज्ज्ञ,  संदर्भ सेवा रुग्णालय