शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष गणनेच्या देयकावरून संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:18 IST

शहरात वृक्ष गणना करताना ज्यादा आलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या खर्चावरून संशय व्यक्त केला जात असतानाच ही रक्कम ठेकेदार कंपनीला मिळवून देण्यासाठी काही नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर आता घाईघाईने हा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत सादर करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देमंगळवारी महासभेत चर्चा : ठेकेदारासाठी नगरसेवकांची धावाधाव

नाशिक : शहरात वृक्ष गणना करताना ज्यादा आलेल्या सुमारे दोन कोटी रूपयांच्या खर्चावरून संशय व्यक्त केला जात असतानाच ही रक्कम ठेकेदार कंपनीला मिळवून देण्यासाठी काही नगरसेवकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर आता घाईघाईने हा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत सादर करण्यात येणार आहे. प्रशासकिय मान्यता न घेतल्याने संबंधीत ठेकेदार कंपनीच्या चुकीवर विधी विभागाने ठपका ठेवला आहे, मात्र दुसरीकडे ठेकदार कंपनीला मोबदला न दिल्यास ही कंपनी न्यायालयात दाद मागेल अशी भीती देखील दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे विधी विभागाच्या अहवालाविषयी देखील संशय कल्लोळ निर्माण झाला आहे.महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्षांची गणना काम एका ठेकेदार कंपनीस देण्यात आले होते. या संस्थेने शहरात केलेल्या गणेनुसार शहरात ४८ लाख वृक्षांची नोंद झाली असून त्यातील २४ लाख वृक्षांची वाढीव गणना करावी लागली असे संबंधीत कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे वृक्ष गणना करणे त्यांची नोंद करून जीपीएस लावणे या कामासाठी कंपनीने १ कोटी ९० लाख रूपयांचे ज्यादा देयक सादर केले आहे. मात्र, अशाप्रकारे आर्थिक नियोजन बदलल्यानंतर प्रशासनाने संबंधीतांना परवानगी दिली असेल तर त्यासाठी कोणत्या ना कोणत्या समितीची प्रशासकिय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे झालेले नाही. यासंदर्भात काही नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत सादर प्रस्तावावरून बरीच चिकित्सा केली होती.  कोणाच्या आदेशानुसार या कंपनीने अतिरीक्त काम केले, खर्चाला मान्यता देण्याचे अश्वासन कोणी दिले होते, असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. तर हा प्रस्ताव थेट महासभेत येण्याआधी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधीकरण समितीकडे सादर करण्याची मागणी या समितीच्या सदस्यांनी केली होती. यासंदर्भात विधी विभागाचा सल्ला घेण्याचा ठराव महासभेत करण्यात आला होता. आता येत्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत सादर करणार असून खर्चाला मंजुरी नव्हे तर निर्णय व्हावा असे प्रस्तावात नमुद केले आहे.  विशेष म्हणजे विधी विभागाने वाढीव वृक्षगणनेच्या  सुमारे दोन कोटी रूपयांच्या देयकासंदर्भात दिलेला अभिप्राय संभ्रम निर्माण करणारा आहे. वृक्षगणना करणा-या ठेकेदार कंपनीने वाढीव कामाकरता प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक होते, मात्र ती मंजुरी घेतली नसल्याने ठेकेदार कंपनीला अहवालात दोषी धरण्यात आले आहे. n महापालिकडून मोबदला न मिळाल्यास ठेकेदार कंपनी न्यायालयात जाऊ शकते हे खरे असले तरी त्यात विधी विभागाने नवीन संशोधन केलेले नाही. मोबदल्यासाठी यापूर्वीही ठेकेदार कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत. महापालिका त्यासंदर्भातील युक्तीवाद किती पारदर्शक आणि योग्य पध्दतीने करते ते महत्वाचे आहे. तथापि, ठेकेदार कंपनीची चूक असताना देखील न्यायालयात जाण्याची भीती दाखवून रक्कम दिली जात असेल तर ते कितपत उपयुक्त आहे, असा प्रश्न केला जात आहे.n संबंधित मोबदला अदा न केल्यास संस्था न्यायालयात जाऊ शकते व त्यामुळे मनपा अडचणीत येऊ शकते, असाही अभिप्राय दिला आहे. यामुळे मंजुरी नव्हे, तर निर्णयास्तव प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीमार्फत सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सादर करावा यासाठी काही नगरसेवकांचादेखील उद्यान विभागावर दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठेकेदाराला दोन कोटी रुपये ज्यादा देण्यामागे स्वारस्य नक्की कशासाठी? असादेखील प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCrime Newsगुन्हेगारी