भद्रकाली परिसरातील घरफोडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

By Admin | Updated: April 8, 2017 15:03 IST2017-04-08T15:03:34+5:302017-04-08T15:03:34+5:30

भद्रकाली परिसरातील घरफोडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

Domestic jewelery theft in Bhadrakali area | भद्रकाली परिसरातील घरफोडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

भद्रकाली परिसरातील घरफोडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

नाशिक : घराचा दरवाजाचा कुलूप वाकवून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारकाजवळील समर्थनगरमध्ये गुरुवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास घडली़
तपोवनरोडवरील नायेशा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर नऊमधील रहिवासी गीतांजली भट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप वाकवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले़
या प्रकरणी भट यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Domestic jewelery theft in Bhadrakali area