जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

By Admin | Updated: September 28, 2016 01:06 IST2016-09-28T01:05:57+5:302016-09-28T01:06:26+5:30

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

District Police started the sports competitions | जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना सुरुवात

नाशिक : पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासली जावी तसेच त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा या संकल्पनेतून जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या क्रीडा स्पर्धेचे मंगळवारी (दि. २७) आडगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी नाशिक ग्रामीण, पेठ, निफाड, मनमाड, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण, कळवण येथील पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व्हॉलीबॉल सामन्याने झाला. यावेळी पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीणविरुद्ध मालेगाव विभाग यांच्यात झालेल्या सामन्यात मालेगाव संघाने विजय प्राप्त केला. गुरुवार (दि. २९) पर्यंत आयोजित या स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहे.
मंगळवारी झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण प्रशांत मोहिते, पोलीस उपअधीक्षक
नाशिक ग्रामीण डी. एस. घोगरे, मालेगाव शहर उपविभागाचे अजित हगवणे, सुरेश पारधी यांच्यासह
वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: District Police started the sports competitions