जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासनिधीचे दोन कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST2021-01-08T04:41:59+5:302021-01-08T04:41:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नाशिक : स्थानिक विकासकामांसाठी आमदारांना देण्यात येणारा दोन काेटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाला ...

District MLAs receive Rs 2 crore from local development fund | जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासनिधीचे दोन कोटी प्राप्त

जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासनिधीचे दोन कोटी प्राप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : स्थानिक विकासकामांसाठी आमदारांना देण्यात येणारा दोन काेटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी एक तर आता डिसेंबरअखेर आणखी एक असे दोन कोटी रुपये आमदार निधीसाठी प्राप्त झालेले आहेत. आमदार निधीसाठी देण्यात येणारा दोन कोटींचा निधी, यामुळे पूर्णपणे प्राप्त झाला असल्याने, जिल्ह्यात आता आमदार निधीतील कामांना गती मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट ओढावल्याने आमदारांचा विकास निधीही गोठविण्यात आला होता. राज्य सरकारने आता आमदारांना निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हा नियोजन विभागाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांच्या प्रस्तावांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्पूर्वी विशेषबाब म्हणून देण्यात आलेला प्रत्येकी ५० लक्ष रुपयांचा निधी कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या निर्देशामुळे बहुतांश आमदार निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यात आला आहे. आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये आमदार निधी दिला जातो. त्यातील प्रत्येकी एक कोटींचा असे सुमारे १७ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार, आमदारांनी सुचविलेल्या कामांच्या मंजुरी झालेल्या आहेत. आता पुन्हा प्राप्त झालेल्या प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या कामांच्या शिफारशी केल्या जाणार आहेत.

--इन्फेा--

रस्ते विकास आणि बांधकामावर खर्च

आमदारांनी सुचविलेल्या बहुतेक कामांमध्ये सभामंडप, स्मशानभूमी, समाज मंदिर, पाटावरील मोरी, बांधण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाते.

--इन्फो--

प्राथमिक गरजा असलेल्या नळजोडणी, रस्तादुरुस्ती, याबरोबरच बांधकामाशी निगडित कामे प्राधान्याने केली जातात.

आरोग्य केंद्रे, रुग्णालयासाठी साहित्यासाठी मदत

--इन्फो--

आमदारांना यंदा दोन टप्प्यांत प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यानुसार, आमदारांनी पहिल्या टप्प्यातील सुचविलेल्या कामांच्या मंजुरी झालेल्या आहेत. आता आठ दिवसांपूर्वीच प्रत्येकी एक-एक कोटींचा निधी नियोजन विभागाकडे वर्ग झाला आहे. आमदारांना कामांची शिफारस करण्याचे पत्र नियोजन विभागाकडून पाठविण्यात आले आहे.

Web Title: District MLAs receive Rs 2 crore from local development fund