शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकांच्या नाड्या आवळल्या, कोट्यवधींच्या ठेवी वळाल्या?

By admin | Updated: November 16, 2016 00:28 IST

जिल्हा बॅँकांच्या नाड्या आवळल्या, कोट्यवधींच्या ठेवी वळाल्या?

नाशिक : देशभरातील कोणत्याही जिल्हा बॅँकांना पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्यामुळे जिल्हा बॅँकांमध्ये जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या ठेवी राष्ट्रीयीकृत व अन्य नागरी बॅँकांमध्ये वळाल्याची ओरड आता जिल्हा बॅँकांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा बॅँक उच्च न्यायालयात गेल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सूत्रांनी दिली.  दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बॅँकेप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, याबाबत बुधवारी (दि. १६) संचालक मंडळ व प्रशासनाच्या तातडीच्या अनौपचारिक बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  मंगळवारी (दि. १५) यासंदर्भात जिल्हा बॅँकेचा काही अधिकारीवर्ग मुंबईला तातडीने गेल्याची चर्चा होती; मात्र हा मुंबई दौरा खासगी स्वरूपाचा असल्याचे समजते. बुधवारी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत नोटा न स्वीकारणाच्या रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयाबाबत चर्चा होणार असल्याचे कळते. चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बॅँकांच्या शेकडो सभासदांनी नोटा भरण्यासाठी बॅँकांमध्ये गर्दी केली होती. नाशिक जिल्हा बॅँकेतही तीन दिवसात तब्बल २७० कोटींचा निधी बचत खात्यात जमा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. तसेच पीक कर्जापोटी ४ ते ५ कोटींचा भरणाही या जुन्या नोटांचा रूपाने झाल्याचे समजते. सोमवारी (दि. १४) रात्री रिझर्व्ह बॅँकेने देशभरातील सर्व जिल्हा बॅँकांना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अन्य बॅँकांमध्ये वळाल्याचा आरोप जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे.