पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय

By Admin | Updated: January 9, 2017 00:34 IST2017-01-09T00:34:23+5:302017-01-09T00:34:40+5:30

खामखेडा : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

Disadvantages of not being a veterinary officer | पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय

पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय

खामखेडा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचारांअभावी शेतकऱ्यांना महागडी अशी जनावरे गमवावी लागत आहेत. तेव्हा खामखेडा (ता. देवळा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर देण्यात यावा, अशी मागणी खामखेडा, सावकी, पिळकोस परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खामखेडा हे गाव कळवण तालुक्यात होते तेव्हा खामखेड्यात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. परंतु या दवाखान्यात गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांची बदली झाली तेव्हापासून येथे पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यांचा कार्यभार व दवाखान्याचा कारभार व्रणोपचारक व दोन शिपाई यांच्यावर चालू आहे. सध्या या गावाचा कामधेनू दत्तक यामध्ये समावेश असल्याने पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यास कामधेनूचे पशुधन कितपत वाढीस लागेल याबद्दल शेतकऱ्यांना शंका आहे. आजारी जनावरे दवाखान्यात नेल्यावर तेथे डॉक्टर नसल्याने शिपाई जनावरांवर उपचार करतात. योग्य आजारावर योग्य उपचार होत नसल्याने बऱ्याच वेळा जनावरे मरण पावतात. अशा वेळी शेतकऱ्यांना आपल्या महागड्या अशा जनावरांवर वेळेवर इलाज करण्यासाठी खासगी डॉक्टरांना बोलावून महागडे उपचार करून घ्यावे लागत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Disadvantages of not being a veterinary officer