शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या आघाडीची शहरात निदर्शने

By admin | Updated: September 4, 2014 00:52 IST

डाव्या आघाडीची शहरात निदर्शने

नाशिक : पुणे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी डाव्या आणि लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से), भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यामुळे हल्लेखोरांना उन्माद आला असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद बाळगून आहे, परंतु लोकशाही मूल्याचा मान राखला जात आहे. शासनाने हल्लेखोरांचा तातडीने तपास करून त्यांना कडक समज द्यावी व गजाआड करावे, अशी मागणी करून पुणे येथील माकप कार्यालयावरील हल्ल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, राजू देसले, मनीष बस्ते, एकनाथ येवले, डॉ. संजय जाधव, केरू पाटील हगवणे, महेंद्र दातरंगे, तानाजी जायभावे, सचिन भोर, दत्ता निकम, किसन गुजर आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)