कांद्याला अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:27+5:302020-12-04T04:40:27+5:30

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सदर निवेदन पाठवण्यात आले. केंद्र सरकारने कांदा व्यापार्‍यांना स्टॉक लिमिट ठेवले तर सलग पाच ...

Demand for subsidy for onions | कांद्याला अनुदान देण्याची मागणी

कांद्याला अनुदान देण्याची मागणी

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सदर निवेदन पाठवण्यात आले. केंद्र सरकारने कांदा व्यापार्‍यांना स्टॉक लिमिट ठेवले तर सलग पाच दिवस कृषी मार्केट बंद राहिल्यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणात झाली. नवीन लाल कांदा बाजारात आला तर केंद्र सरकाने बाहेरील देशातून कांदा आयात केल्यामुळे प्रचंड प्रमाणात कांदा भावात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असून, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संताप व्यक्त केला जात असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींना पाठविल्या आहेत.

Web Title: Demand for subsidy for onions