शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

नाशकात पोटनिवडणुकीवर डोळा ठेवणा-यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 7:26 PM

नाशिक : नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरी लावल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिल्याने शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द होण्यावर डोळा ठेवून पोट निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये मंगळवारी ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण होते.भारतीय जनता पक्षाकडून हेमंत शेट्टी महापालिकेच्या निवडणुकीत ...

ठळक मुद्दे नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरीप्रभाग क्रमांक चारमध्ये मंगळवारी ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण

नाशिक : नगरसेवक हेमंत शेट्टी यांनी नाशिक महापालिकेच्या महासभेला हजेरी लावल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिल्याने शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द होण्यावर डोळा ठेवून पोट निवडणुकीची तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमध्ये मंगळवारी ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण होते.भारतीय जनता पक्षाकडून हेमंत शेट्टी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले, परंतु अवघ्या दोन महिन्यांतच त्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी शेट्टी यांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच तुरुंगात केली होती. मे महिन्यात हा प्रकार घडल्याने तेव्हापासून शेट्टी हे महापालिकेच्या तसेच पंचवटी प्रभागाच्या मासिक सभेत गैरहजर राहिले. महापालिका अधिनियमान्वये एखादा सदस्य सहा महिने सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे. हेमंत शेट्टी हे मे महिन्यापासून गैरहजर असल्यामुळे त्यांचे सदस्य पद रद्द होऊ शकते व त्यानंतर महापालिकेला पोटनिवडणुक घेण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहणार नाही अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली व त्यादृष्टीने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, खुनाचा कट रचल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या शेट्टी यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, परंतु तो फेटाळण्यात आल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली, न्यायालयाने शेट्टी यांना जामीन मंजूर केला. परंतु न्यायालयीन आदेश हाती न पडल्यामुळे शेट्टी यांची सुटका लांबणीवर पडली. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने बोलविलेल्या महासभेत शेट्टी यांची हजेरी अनिवार्य असल्याचे कायदेशीर व तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने भाजपाची व विशेष करून शेट्टी समर्थकांची धावपळ उडाली, त्यामुळे शेट्टी यांनी महापालिकेत हजेरी लावू नये यासाठी काही मंडळींनी अक्षरश: देव पाण्यात बुडविले, मात्र उच्च न्यायालयाचा आदेश जरी मिळाला नाही तरी, जिल्हा न्यायालयाने काही वेळासाठी शेट्टी यांना महासभेत हजर राहण्यासाठी मुभा दिल्यामुळे मंगळवारी शेट्टी महासभेत दाखल झाले, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अबाधित राहिल्याने साºयांचा जीव भांड्यात पडला. तथापि, या निमित्ताने प्रभाग चारमध्ये पोटनिवडणुकीची तयारी करणा-यांचा मात्र हिरमोड झाला. दुसरीकडे शेट्टी याचे पद शाबूत राहिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी जल्लोष साजरा केला.

 

टॅग्स :Crimeगुन्हाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका