शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या पीक उत्पादनात घट

By admin | Updated: November 20, 2014 00:32 IST

जिल्ह्याच्या पीक उत्पादनात घट

 

नाशिक : जिल्ह्यातील सुधारित पीक आणेवारीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गावांचा समावेश असल्याने त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल वस्तुनिष्ठ असल्याचा निर्वाळा पालक सचिव श्रीकांत सिंह यांनी दिला. पीक कापणी प्रयोगानंतर प्रत्यक्ष पीक उत्पादनाचा अंदाज येणार असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील पीक उत्पादनात घट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. शासनाने दिलेल्या आदेशानुसार पीक आणेवारी कमी येण्यामागच्या कारणांची मीमांसा करण्यासाठी अगोदरच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्याची मुद्दाम निवड करण्यात आली.प्रत्यक्ष भेट दिल्यावर अधिकाऱ्यांनी केलेली पीक आणेवारी वस्तुनिष्ठ असल्याचे आढळून आले; परंतु पीक कापणी प्रयोगानंतरच उत्पादनाचा खरा अंदाज येणार असल्याने अधिकाऱ्यांनी ती काळजीपूर्वक करावी अशा सूचना आपण दिल्या असून, तसे झाल्यासच कायमस्वरूपी पीक आणेवारी निश्चित करता येणे शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. या पाहणीचा अहवाल शासनाला दिल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याबाबत शासन निर्णय घेऊ शकेल असे सांगून, मराठवाड्यातही काही ठिकाणी कमी आणेवारी आल्याने तेथेही पाहणी करण्यात आल्याची पृष्टी जोडली. (प्रतिनिधी)