दत्तमंदिररोड परिसरात दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र खेचले

By Admin | Updated: April 8, 2017 16:53 IST2017-04-08T16:53:32+5:302017-04-08T16:53:32+5:30

दत्तमंदिररोड परिसरात दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र खेचले

In the Dattamandirod area, a woman of two-wheeler mangalasutra pulled out | दत्तमंदिररोड परिसरात दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र खेचले

दत्तमंदिररोड परिसरात दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : भाजी खरेदी केल्यानंतर दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड - दत्तमंदिररोडवरील तरण तलावाजवळ घडली़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरती सुरजे (२४, राग़ुरुशरण सोसायटी, धोंगडेनगर, दत्तमंदिर रोड, नाशिकरोड) या भाजी खरेदी करून तलावाच्या भिंतीलगतच्या रस्त्याने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून घरी जात होत्या़ त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने सुरजे यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन तोळे वजनाचे पॅण्डल असलेले मंगळसूत्र खेचून नेले़ यानंतर दुचाकीवरील संशयित नाशिक-पुणा रोडच्या दिशेने फरार झाले़
या प्रकरणी सुरजे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: In the Dattamandirod area, a woman of two-wheeler mangalasutra pulled out