शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दशक्रिया घाटाची वाट बनली बिकटवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:24 IST

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे झुकणा-या विंचूर गावातील दशक्रि याविधीच्या शेड दुरवस्था अन भौतिक असुविधांमुळे नागरिकांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड नाराजी वाढत असून, समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षाभरापूर्वी येथील रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या अनेक समस्या मार्गी लागल्याने ग्रामपालिकेने स्मशानभूमीचा कायापालट घडवून आणला आहे. असे असले तरी येथील लोणगंगा नदीपात्रालगत असलेल्या दशक्रि या विधीच्या ठिकाणी समस्यांचा महापुर ओसांडुन वाहत आहे. येथे आल्यास आपण विंचूरसारख्या शहरात आहोत की, आदिवासी दुर्गम भागात आलो? असाच प्रश्न स्थानिक नागरिकांसह विधीसाठी आलेल्या आप्तेष्टांना पडावा इतकी दुरावस्था या ठिकाणची आहे.शेड एका बाजुस झुकले असून पावसाळ्यात अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते.गावातून दशक्रि या शेडकडे येणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या घाटाच्या ठिकाणी गावातुन येणा-या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असल्याने पावसाळ्यात दशक्रि या विधीच्या शेडकडे यायला जागा नसते. चिखलमय रस्त्यातून वाट काढत नागरिकांना येथे येऊन कुठेतरी आसरा घ्यावा लागतो. किमान पावसाळ्यात शेडलगत आजुबाजुला मुरु म टाकुन हा प्रश्न तात्पुरता सोडविला जाऊ शकतो. मात्र यंदा पावसाळ्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा दशक्रि या विधी कार्यक्र मासाठी आलेल्या नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागले. परिणामी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेडच्या ओट्याची लांबी वाढवून घ्यावी, विधीसाठी आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था, शेडलगत स्वच्छता करावी, पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर करावी, परिसरात विविध प्रकारची झाडे लावून सुशोभीकरण केल्यास नदी परिसराचे सुशोभिकरण होईल, पाण्यासाठी येथे नळाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक