शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप बंदमुळे संकट

By admin | Updated: September 8, 2016 01:15 IST

शेतकऱ्यांपुढे प्रश्न : व्याजाने पैसे घेऊन करावी लागतात शेतीची कामे

सिद्धपिंप्री : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने पीककर्ज वाटप बंद केले असून त्यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना व्याजाने खासगी व्यक्तींकडून पैसे आणून खर्च करावा लागत आहे.जिल्हा बॅँकेकडून कर्जाऊ रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे सोसायटीकडे अर्ज दिले; मात्र जिल्हा बॅँकेने थेट पीककर्ज बंद केल्याचे स्पष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सप्टेंबर अखेरीस किंवा आॅक्टोबरमध्ये द्राक्ष छाटणी सुरू होणार आहे. यावर्षी भाजीपाल्याला पुरेसा भाव नसल्याने शेतकरी आता द्राक्षावर अवलंबून आहेत, अशा वेळी शेतकऱ्यांना आता पीककर्ज न मिळाल्यास उद्ध्वस्त होण्याची वेळ येणार आहे. गेल्या जिल्हा बॅँकेकडून कर्ज वाटप बंद असून शेतकऱ्यांंनी विनवणी करूनही पीककर्जाचे वाटप सुरू केलेले नाही. त्यामुळे आठ दिवसांत पीककर्ज वाटप न केल्यास जिल्हा बॅँकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढिकले, जिल्हा परिषद सदस्य अलकाताई साळुंखे, नाशिक तालुक्याच्या पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकरराव ढिकले तसेच नामदेव ढिकले, यशवंत ढिकले, उपसरपंच सुला पवार, भाऊसाहेब ढिकले, उत्तमराव राजोळे, राजेंद्र जाधव, प्रकाश ढिकले, बाळासाहेब उखार्डे, नवनाथ ढिकले, अंबादास ढिकले, रमेश कुमावत, बाळासाहबे ढिकले यांनी एका निवेदनाद्वारे दिले आहे. (प्रतिनिधी)