शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते दुरुस्त न केल्यास ठेकेदारावर फौजदारी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे ...

सिन्नर : खराब रस्ते तत्काळ दुरुस्त केले नाहीत, तर समृध्दी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे.

नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाच्या कामामुळे सिन्नर मतदारसंघातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता भोसले यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

इगतपुरी तालुक्यात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी खोदलेले मटेरियल वापरले जाते. कोनांबे ते जुना शिवडे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. नवीन शिवडे - कोनांबे रस्त्यातील वळणे काढून रस्ता बनवावा. खराब झालेल्या रस्त्यांचे केवळ खड्डे भरून चालणार नाहीत, रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या हायवा जात असल्याने बीबीएम कारपेट करून घ्यावे, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या.

जिल्हा परिषदेंतर्गत येणारे १६ रस्ते खराब झाले आहेत. तथापि, पांढुर्ली - बोरखिंड रस्ता आणि आगासखिंड रस्ता बेलूजवळ २० मीटर भूसंपादनाचा प्रश्‍न प्रलंबित असून, भूसंपादन अधिकाऱ्यांनी हा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा. सिन्नर - घोटी रस्त्यावर समृध्दी महामार्गाचे क्रॉसिंग आहे. त्या ठिकाणी १ कि. मी. रस्त्यावर तत्काळ कारपेट करावे तसेच प्रत्येक समृध्दी क्रॉसिंगच्या ठिकाणी काँक्रीट करावे, अशा सूचनाही आमदार कोकाटे यांनी केल्या. मिठसागरे ते वावी रस्त्याचे जूनपर्यंत काम चालू राहणार आहे. त्यामुळे भोजापूर धरणातून माती काढून वापरण्यास त्यांनी सांगितले.

इन्फो...

या रस्त्यांचीही दुरवस्था

पांगरी - मर्‍हळ, गोंदे - दापूर - चापडगाव रस्ता खराब झाला असून, दोडी - खंबाळे, नांदूर - मर्‍हळ - वावी रस्ताही नवीन करावा, असे सांगताना आमदार कोकाटे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खराब रस्ते नवीन करण्याचे निर्देश दिलेले असल्याकडे लक्ष वेधले. घोटेवाडी आणि कहांडळवाडी रस्त्याची अवस्था वाईट झाली असून, पांगरी ते मिठसागरे रस्ता नवीन काम चालू आहे. तरी त्यावर पुन्हा खड्डे पडले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सिन्नर-घोटी सा. बां.ने राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करावा

धामणगाव - टाकेद रस्ता तत्काळ दुरुस्त करावा

जि. प.चे १९ कि. मी., सा. बां.चे ४२ कि. मी. रस्ते खराब

केवळ खड्डे न बुजवता डब्लूबीबीएम, कारपेट करावे.

फोटो (२२ सिन्नर समृद्धी)

===Photopath===

220121\22nsk_4_22012021_13.jpg

===Caption===

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याच्या कामाबाबत आयोजित बैठकीत बोलताना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत मुख्य अभियंता भोसले व अधिकारी.