शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडण्याच्या कारणावरून मारहाण

By admin | Updated: November 14, 2015 23:53 IST

आगर टाकळी : पोलिसांनाही धक्काबुक्की

नाशिक : लहान मुलांनी रस्त्यावर फटाके फोडल्याचा राग येऊन टोळक्याने आगर टाकळीच्या वैदुवाडीतील पवार कुटुंबीयांस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी १२ संशयितांवर जिवे ठार मारण्याचा तसेच महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, विजेंद्र बापू पवार ऊर्फ पिंटू यांच्यांशी संशयित सागर मनोहर ढवळे, सुगंध अनिल निर्मळ, मनोहर पंढरीनाथ ढवळे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी भांडण केले होते़ बुधवारी वैदुवाडीत लहान मुले रस्त्यावर फटाके वाजवित असताना संशयितांनी त्यांना मारहाण केली़ त्यावेळी मुलांना मारू नका, असे पवार यांच्या सांगण्याचा राग आल्याने संशयित घरात घुसले़ त्यांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड, लोखंडी चाकू व दगडाने मारहाण करून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच पवार यांच्या भावजयीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले तसेच दुचाकीचेही नुकसान केले़यानंतर ढवळे यांनी उपनगर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून संशयित राजेश दुर्गा पवार, भारत बाबूराव लोखंडे, बाबा पवार यांनी पंधरा-वीस साथीदारांसह लक्ष्मीबाई ढवळे यांना मारहाण करून वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले़ याप्रकरणी उपनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत़