शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतीचे जतन : भालूरच्या महिलांनी जोपासली परंपरा

By admin | Updated: July 30, 2014 00:21 IST

इडापिडा टळो, लक्ष्मीआईला साकडे !

गिरीश जोशी ल्ल मनमाडसध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात पारंपरिक रीतिरिवाज लोप पावत असले तरी नांदगाव तालुक्यातील भालूर येथील महिलांनी मात्र आषाढ अमावास्येला पूर्वापारपणे चालत आलेल्या गावाबाहेरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करून इडापिडा टळण्यासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही जोपासली आहे.अमावास्या म्हटली म्हणजे अशुभ दिवस असा समज सर्वत्र असला तरी, भालूर येथे या दिवशी मात्र वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्याचा समारोपाचा दिवस असलेल्या अमावास्येला गावाच्या पूर्व शिवारात उंच टेकडीवरील लक्ष्मीआई मंदिरात नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. येथील महिलांनी ही रूढी आजही जोपासली आहे. महिला आपापल्या घरी तयार केलेला नैवेद्य घेऊन टेकडीवर मंदिरासमोर जमा होतात. येथील लक्ष्मीआई मंदिरात मनोभावे पूजन करून नैवेद्य ठेवण्यात येतो. गावातील इडापीडा टळून गावात सुखसमृद्धी नांदो यासाठी लक्ष्मीआईला साकडे घालण्यात येते. सर्व महिला एकमेकीला हळदीकुंकू लावून स्रेहभाव व्यक्त करतात. मंदिरासमोरच्या प्रांगणात सुख-दु:खाच्या विचारांची देवाणघेवाण होते. काही महिला आषाढ महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात येउन पूजन करतात. सध्या शहरी भागातील महिला विविध क्लबच्या माध्यमातून एकत्र येऊन गेट टूगेदर करत असल्या तरी भालूर येथील महिलांचा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परांपरा जोपासण्याच्या प्रयत्नातून आपोआपच विचारांची देवाणघेवाण होत आहे.