शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील दुभाजकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नाशिक : जुने नाशिक, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि ...

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

नाशिक : जुने नाशिक, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांनाही त्यांची भीती वाटत आहे. बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्त्यावर टाकलेले शिळे अन्न, दुकानांतून फेकले जाणारे पदार्थ यामुळे कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उद्यानांमधील गवताने डासांचा उपद्रव

नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उद्यानांमधील गवत काढून उद्याने पुन्हा सुशोभित करावीत. तसेच परिसरात धूरफवारणी करून डासांचा उपद्रव कमी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या

नाशिक : शहरातील सातपूर भागात सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरांच्या झुंडी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे कधी तर नागरिकांचे अपघातदेखील होतात.

थुंकणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई

नाशिक : कोरोनाचे थैमान सुरूच असल्यामुळे पान, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या मास्क न लावल्यास कारवाई होते. मात्र, मास्क बाजूला सारून रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्या नागरिकांना दंड झाल्याचे दिसत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

रुग्णांच्या कुटुंबीयांची धावाधाव

नाशिक : अनेक रुग्णांना अद्यापही ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड धावाधाव होत आहे. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या जवळचे नातेवाईकदेखील मदतीला येऊ शकत नसल्याने कुटुंबातील दोन-तीन बाधित झाल्यास उर्वरित एका व्यक्तीलाच सर्व धावपळ करावी लागत असल्याने नागरिकांची प्रचंड दमछाक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.