शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कार्यशाळेत आयुक्तांचे मार्गदर्शन

By admin | Updated: October 22, 2016 00:04 IST

कळवण : तालुका स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

कळवण : नाशिक तालुक्यापाठोपाठ कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीसह तहसील, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह सर्व विभागांची जबाबदारी व कर्तव्य असून, सर्वांनी एकजुटीने काम करून नागरिकांशी सुसंवाद साधावा. स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे ओळखून पाऊले उचलावी व नोव्हेंबरअखेर कळवण तालुका स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.पंचायत समिती कळवण येथील सभागृहात गुरुवारी (दि. २०) सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महसूल आयुक्त एकनाथ डवले होते. बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे (पा. व स्व.) आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते.  ज्या ठिकाणी मानसिकता बदलणे अवघड आहे तेथे पोलीस ठाणे व तलाठी यांच्या सहकार्याने प्रसंगी कठोर पावले प्रशासनाने उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत देऊन कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून प्रस्तावित ३३ गावांच्या संपर्क अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांकडून गावातील शौचालय बांधकाम प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.  यावेळी स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाचा माहितीपट कळवणचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी सादर केला. कळवण तालुका हगणदारीमुक्त आढावा बैठकीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक संजय घाटगे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे व बशीर शेख, परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक प्रदीप आहिरे यांच्यासह कळवण तालुक्यातील सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. (वार्ताहर)