शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या जाहिरातीही आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: January 20, 2017 01:03 IST

यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष : नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या छबी कायम

नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने मतदारांवर राजकीय पक्ष, उमेदवारांनी ज्याप्रमाणे प्रभाव टाकणाऱ्या घोषणा करण्यास बंदी घातली आहे त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना व सवलतींबाबत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिराती, फलकांच्या माध्यमातूनही आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे मत झाले आहे. त्यामुळे अशा जाहिराती तत्काळ काढून टाकण्याचे आदेश आयोगाने दिले असले तरी, नाशकात पंतप्रधान नरेंद्र्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबी अजूनही झळकत आहेत. जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नाशिक महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, त्यामुळे नवीन कामांना सुरुवात, मंजुरी, लोकार्पण यांसारख्या बाबी टाळण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असून, त्याचबरोबर मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा व प्रलोभने, आमिषे दाखविण्यावरही निर्बंध लादण्यात आलेले असून, राजकीय पक्ष, संघटना, संस्थांचे फलक, ध्वज, बॅनर काढून टाकण्यात आलेले आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे फलक कायम असल्याचे पाहून राज्य आयोगाने दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भात नव्याने आदेश जारी केले आहेत. त्यात सत्तारूढ पक्ष, त्यांच्या घोषणा व जाहिराती या सार्वजनिक पैशातून मुद्रित केल्या जात असल्याचे म्हटले आहे. शासन पुरस्कृत जाहिरातींच्या माध्यमातून सत्तारूढ पक्षाचा प्रचार वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकत असल्याने शासनाने निवडणूक आचारसंहिता काळात मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शासनाची कामगिरी ठळकपणे करण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर शासनाच्या खर्चाने कोणत्याही जाहिराती देण्यावर बंदी असल्यामुळे अशा जाहिरातींमधून पक्षाच्या नेत्यांचे फोटोदेखील छापण्यास पर्यायाने बंदी घालण्यात आली असल्याचे आयोगाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)