शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाच्या दागिन्यांचा अपहार

By admin | Updated: January 23, 2016 23:59 IST

नाशिकमध्ये गुन्हा दाखल : साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने

नाशिक : शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत एका ग्राहकाने ठेवलेल्या साडेपाच लाखांच्या सोन्याचा बँकेच्या शाखाधिकाऱ्यांसह दोघा उपमहाव्यवस्थापकांनी अपहार केल्याचे उघड झाले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बँकेच्या या तिन्ही अधिकाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या सोने तारण विभागात शाखा अधिकारी म्हणून संशयित निशा प्रियदर्शिनी, उपमहाव्यवस्थापक अर्चना मगर व जयेश आंबेकर हे तिघे कार्यरत आहेत़ गंगापूररोड परिसरात राहणारे डॉ़ रामनाथ पाटील यांचे शरणपूर रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते (६०१२६५०७७६) आहे़ पाटील यांनी घरातील २०५़७७ ग्रॅम सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते.डॉ़ पाटील यांनी बँकेच्या सोने तारण विभागात पाकीट क्रमांक जी / ४३ मध्ये ५ लाख ३१ हजार १३२ रुपयांचे २०५़७७ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते़ बॅँकेचे लेखापरीक्षण करताना सोने ठेवलेले पाकीटच न आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. बँकेचे शाखा व्यवस्थापक लक्ष्मीकांत बहरराव संगणबटला (५८, रा़ ईशा सोसायटी, भाविकनगर, डीजीपीनगर, गंगापूर) यांनी या विभागाच्या चाव्या संशयित प्रियदर्शिनी, मगर व आंबेकर यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या तिघांवर आरोप ठेवण्यात आला आहे.शाखा व्यवस्थापक संगणबटला यांना सोने तारण विभागातील डॉ़ पाटील यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बँकेतील या तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली़ या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत़ (प्रतिनिधी)