शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
4
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
5
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
6
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
7
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
8
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
9
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
10
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
11
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
12
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
13
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
14
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
15
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
16
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
17
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
18
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
19
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
20
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
Daily Top 2Weekly Top 5

शहर-ग्रामीण बससेवेला पुन्हा ‘ब्रेक’

By admin | Updated: October 13, 2016 01:29 IST

धसका : प्रवाशांचे हाल; खासगी वाहतूक महागली; बससेवा विस्कळीत

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा समाजकंटकांचा धसका घेत शहरातील बिघडलेल्या कायदासुव्यवस्थेमुळे शहर बससेवेला ‘ब्रेक’ लावणे पसंत केले. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपासून बंद झालेली बससेवा बुधवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
परिवहन महामंडळाची शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील बससेवा रविवारपासून विस्कळीत झाली आहे. परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने मुंबई मार्गावरील सर्व बसेस मागील चार दिवसांपासून पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. या मार्गावरील कुठल्याही शहरापर्यंत एकही बस अद्याप नाशिकच्या महामार्ग स्थानकातून सोडण्यात आलेली नाही. तसेच मुंबईहून एकही बस शहरात आलेली नाही. सोमवारी सकाळी शहर बस वाहतूक रात्रीपर्यंत सुरळीत सुरू राहिल्याने नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबरोबरच मंगळवारी शहरासह ग्रामीण बससेवाही पूर्ववत झाली; मात्र मंगळवारी सायंकाळपासूनच पुन्हा विविध भागांमध्ये समाजकंटकांकडून कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावणाऱ्या घटना घडू लागल्याने पोलीस प्रशासनाने महामंडळाला बससेवा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्काळ महामंडळाने शहरातील शंभराहून अधिक बसेस तत्काळ आगारामध्ये थांबविल्या. (प्रतिनिधी)