आवक घटल्याने कोथिंबीर ३० रुपये जुडी

By Admin | Updated: January 9, 2017 00:41 IST2017-01-09T00:41:02+5:302017-01-09T00:41:15+5:30

आवक घटल्याने कोथिंबीर ३० रुपये जुडी

Cilantro 30 rupee pairs due to reduced incomes | आवक घटल्याने कोथिंबीर ३० रुपये जुडी

आवक घटल्याने कोथिंबीर ३० रुपये जुडी

नाशिक : शनिवारी बाजार समितीत कोथिंबीर मालाची आवक अत्यल्प झाल्याने बाजारभाव तेजीत आले. शनिवारी सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला ३० रुपये असा बाजारभाव मिळाला.
शनिवारच्या दिवशी बाजार समिती बंद राहत असल्याने कोथिंबीरची अत्यल्प आवक झाली होती. दोन दिवसांपूर्वी ८ ते १० रुपये जुडी दराने विक्री झालेल्या कोथिंबीरला ३० हजार रुपये शेकडा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आणलेल्या टमाट्याला अद्याप चांगला भाव मिळत नाही.
शनिवारी बाजार समितीत सायंकाळी अंदाजे ३० हजार जुड्यांची आवक आली होती. बाजार समितीतील शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत विक्रीसाठी दाखल झालेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला ३० रुपये बाजारभाव मिळाल्याचे बाजार समिती संचालक
चंद्रकांत निकम यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Cilantro 30 rupee pairs due to reduced incomes