बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

By Admin | Updated: January 9, 2017 01:23 IST2017-01-09T01:23:04+5:302017-01-09T01:23:18+5:30

बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

Child abuse; Suspect's closet | बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

बालिकेवर अत्याचार; संशयितास कोठडी

 देवळालीगाव : घटनेमुळे परिसरात खळबळनाशिकरोड : देवळालीगावात चार वर्षांची मुलगी खेळत असताना तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयितास सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
देवळालीगावात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घराजवळ एक चार वर्षांची मुलगी खेळत होती. यावेळी संशयित प्रेमकुमार ऊर्फ पप्पू छोटेलाल राजपूत (५५) याने त्या मुलीला घरात बोलवून ओळखीचा फायदा घेत तिच्याशी बोलत बोलत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ती मुलगी घरी रडत गेल्यावर व तिच्या अंगावरील कपडे बघून पाल्यांना घडलेली घटना लक्षात आली.
सदर घटनेची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना कळताच संशयित पप्पू राजपूत याला नागरिक व युवकांनी बेदम चोप दिला. उपनगर पोलिसांना सदर घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित राजपूत याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या नागरिकांशी व तिच्या पाल्याशी चर्चा करून माहिती घेतली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बालिकेवरील अत्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित राजपूत याला शनिवारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Child abuse; Suspect's closet