चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

By Admin | Updated: January 10, 2017 00:33 IST2017-01-10T00:33:30+5:302017-01-10T00:33:42+5:30

चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

Chandwad ran over the administration, petrol pump piled on the aisle | चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

चांदवडला प्रशासनाची धावपळ, पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या

चांदवड : कांद्याचे भाव कोसळल्याने येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने पेट्रोलपंप चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. अर्धा तास आंदोलन करण्यात आले. तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व नेते पंचायत समिती कार्यालयापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे झेंडे, बॅनर्स व पट्टे घेऊन, घोषणा देत मुंबई महामार्गावर एकत्र आले व पेट्रोलपंप चौफुलीवर ठिय्या दिला. मोदी सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेबरोबरच शेतकरीवर्गास वेठीस धरले आहे. नोटाबंदीमुळे सर्वच बाजारपेठेत ठप्प असून, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आंदोलनात खंडेराव अहेर, सुखदेव जाधव, अनिल काळे, विजय जाधव, शहाजी भोकनळ, बाकेराव जाधव, महेश देशमाने, रिजवान घासी, सुभाष शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, बाळासाहेब माळी, रघुनाथ अहेर, अल्ताफ तांबोळी, नगरसेवक अ‍ॅड. नवनाथ अहेर, सुनील ठाकरे, संजय भांबर, महेश न्याहारकर, अनिल पाटील, तुकाराम सोनवणे, शैलेश ठाकरे, डॉ. सुनील पाचोरकर, अमोल भालेराव, प्रशांत गायकवाड, दत्ता वाकचौरे, राजू ठोंबरे, राजू ठोंबरे, राजाभाऊ भालेराव, वैभव अहेर, हर्षद काळे, रेवन ठाकरे, यशवंत ठाकरे, अरुण भालेराव, आनंदराव गायकवाड, गोकुळ ठाकरे, एकनाथ ठाकरे, परशराम ठाकरे आदिंसह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास
चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)

Web Title: Chandwad ran over the administration, petrol pump piled on the aisle