चांदवड पी. डी. सुराणा महविद्यालयाचे सुयश

By Admin | Updated: September 28, 2014 23:56 IST2014-09-28T23:56:10+5:302014-09-28T23:56:39+5:30

चांदवड पी. डी. सुराणा महविद्यालयाचे सुयश

Chandwad P. D. Surah College's Suyash | चांदवड पी. डी. सुराणा महविद्यालयाचे सुयश

चांदवड पी. डी. सुराणा महविद्यालयाचे सुयश

चांदवड : येथील श्रीमान पे. द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या विभागीय पातळीवरील १९ वर्र्षा$ंखालील मुलींच्या कुस्तीच्या स्पर्धेत कु. तेजल गुजर (५५ किलो ग्रॅम), गट व मृणालिनी वानखेडे (५३ किलो ग्रॅम) गटात प्रथम क्रमांक पटकाविला व या खेळाडूंची यवतमाळ येथे राज्यपातळीवर नाशिक विभागातर्फे निवड झाली. तसेच पायकाअंतर्गत झालेल्या जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेतही कु. मृणालिनी वानखेडे हिने प्रथम क्रमांक मिळविला तसेच नाशिक येथे जिल्हा पातळीवरील १९ वर्षाखालील मुलींच्या कराटे या स्पर्धेत कु. वैशाली जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवून धुळे येथे विभागीय पातळीवर प्रवेश मिळविला. या खेळांडूचे संस्थेच्या व महाविद्यालयामध्ये अध्यक्ष बेबीलाल संचेती, समन्वयक कांतीलाल बाफना, महावीर पारख, पी. पी. गाळणकर प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, पर्यवेक्षक प्रा. पी. व्ही. ठाकोर, प्रा. उत्तमराव जाधव, दत्ता शिंपी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Chandwad P. D. Surah College's Suyash