शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पोलिसांपुढे १५२ वाहनांचे मालक शोधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 14:40 IST

नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. त्यात प्रामुख्याने अपघातात नुकसान झालेले वाहने, रस्त्यावर बेवारस पडलेले व चोरांनी सोडून दिलेल्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर क्रमांकही आहेत,

ठळक मुद्देओळख पटवा : अन्यथा लिलावाची रक्कम शासन जमा १२३ दुचाकी, २६ तीन चाकी म्हणजे रिक्षा व ३ चारचाकी ३ वाहनांचा समावेश

नाशिक : विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तसेच चोरीच्या बेवारस पडून असलेल्या सुमारे १५२ दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचे मालक शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे उभे ठाकले असून, या संदर्भात वाहनांच्या अज्ञात मालकांना वेळोवेळी आवाहन करूनही या वाहनांची ओळख पटत नसल्याने अखेर त्यांचा जाहीर लिलाव करून सदरची रक्कम शासन जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बेवारस वाहने पडून आहेत. त्यात प्रामुख्याने अपघातात नुकसान झालेले वाहने, रस्त्यावर बेवारस पडलेले व चोरांनी सोडून दिलेल्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांवर क्रमांकही आहेत, परंतु त्याचा आधार घेवून पोलिसांनी तपास केला असता, त्यावरील क्रमांक बनावट असल्याने बहुतांशाी वाहने चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष करून दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे. पोलिसांनी बेवारस वाहने उचलून पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या केल्या आहेत. अनेक वर्षापासून पडून असलेल्या या वाहनांची अवस्था अतिशय बिकट असली तरी, त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्यापुर्वी वाहनांच्या मालकांचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने वेळोवेळी वाहनांच्या क्रमांकासह यादी जाहीर करून मालकांनी त्याची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आता पुन्हा पोलीस आयुक्तालयाने या वाहनांची यादी जाहीर केली असून त्यात १२३ दुचाकी, २६ तीन चाकी म्हणजे रिक्षा व ३ चारचाकी ३ वाहनांचा समावेश आहे. येत्या दहा दिवसात वाहनांच्या मालकांनी कागदपत्रांसह अ‍ोळख पटवून वाहने घेवून जावेत अन्यथा या वाहनांचा जाहीर लिलाव करून त्याची रक्कम सरकार जमा करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक