रासाकासाठी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:42+5:302020-12-04T04:41:42+5:30

मंगळवारपासून (दि.१) या साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. तिसऱ्या दिवशी बाबूराव सानप, ...

Chain fast for the third day for Rasaka | रासाकासाठी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण

रासाकासाठी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण

मंगळवारपासून (दि.१) या साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. तिसऱ्या दिवशी बाबूराव सानप, भाऊसाहेब मत्सागर, गोकुळ कुंदे, अनिल शिंदे या रासाका बचाव कृती समितीच्या चार कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले. दररोज रासाका बचाव कृती समिती चार कार्यकर्ते या साखळी उपोषणात सामील होत आहेत.

गुरुवारी (दि. ४) धनंजय जाधव, दिगंबर गिते, राजेंद्र मोगल, मधुकर शेलार, गुणवंत होळकर, प्रकाश अडसरे, सतीश मोरे, विकास चांदर, तुकाराम गांगुर्डे, संजय गाजरे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुंड, साहेबराव ढोमसे, सचिन धारराव, संजय गाजरे, योगेश रायते आदी मान्यवरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

Web Title: Chain fast for the third day for Rasaka