शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: August 21, 2014 00:15 IST

नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनची सिन्नर वर्षा रन स्पर्धा उत्साहात

सिन्नर : येथील नवजीवन वर्ल्डपिस फाउंडेशनच्या वतीने आयोजित वर्षा रन - २०१४ स्पर्धा येथील नवजीवन डे स्कूलच्या मैदानात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भूषण मुरकुटे प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला. प्रारंभी सकाळी आठला फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष देशमुख व विजया देशमुख यांच्या हस्ते वर्षा रनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ वाजे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, माजी उपनगराध्यक्ष लताताई मुंढे, पंचायत समितीचे सदस्य उदय सांगळे, नायब तहसीलदार दत्ता वायचळे, एस. बी. देशमुख, अरुण जाधव, बाळासाहेब शेळके, विजय काळे, सोननाथ चांदोरे, बी. बी. पाटील आदि उपस्थित होते. या स्पर्धेत नवजीवन डे स्कूलच्या एक हजार विद्यार्थी, २०० पालक व ४० मान्यवरांची सहभाग घेतला. डुबेरे नाका येथून प्रारंभ झाल्यावर सिन्नर बसस्थानक, गावठा, नवापूल, गणेश पेठ, शिवाजी चौक, वावीवेस, तहसील कार्यालय, टपाल कार्यालय, लाल चौक, नाशिक वेस, भैरवनाथ मंदिर मार्गे पुन्हा नवजीवन डे स्कूलमध्ये दाखल झाले. सिन्नरमध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेत पहिले बक्षीस सायकल देऊन मुरकुटे याचा गौरव करण्यात आला. समरोप कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बक्षिसे दिली. यावेळी नगरसेवक बापू गोजरे, हर्षद देशमुख, सुभाष देशमुख, अनिल काळे, मुकुंद पंडित, संजय आनेराव, नाना भगत, शाहुराज कुंभार, समाधान गायकवाड यांच्या हस्ते सोडत काढून बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक महेंद्र विंचुरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र वाघ, प्रल्हाद देशमुख, राहुल सूर्यवंशी, शरद शिंदे आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)