सटाण्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:45+5:302021-08-18T04:19:45+5:30

येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बागलाणचे प्रांत अधिकारी नीलेश श्रिंगी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप ...

Celebrate Independence Day in Satana | सटाण्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सटाण्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बागलाणचे प्रांत अधिकारी नीलेश श्रिंगी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे उपस्थित होते.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी संचलन केले. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रिंगी यांच्या हस्ते भाक्षी येथील वीरमाता रौंदळ यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील अंतापूर येथील होमगार्ड भरत पवार यांना रोख स्वरूपात आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह शासकीय सेवक उपस्थित होते.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या आवारात विकसित केलेल्या गार्डनचे आमदार बोरसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

170821\17nsk_11_17082021_13.jpg

सटाणा तहसील कार्यालयात ध्वजारोहण

Web Title: Celebrate Independence Day in Satana