मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:52 AM2020-07-13T00:52:05+5:302020-07-13T00:53:01+5:30

गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

In the car, the villagers were detained | मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

मोटारीत गावठी कट्टा बाळगणारे ताब्यात

Next

नाशिक : गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने कमरेला लावून सफारी कारमधून जाणाऱ्या संशयिताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. कारचालकाच्या अंगझडतीत जिवंत काडतुसासह पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
शनिवारी (दि.११) गुन्हे शाखा युनिट-१चे पथक गस्तीवर होते. यावेळी पोलीस नाईक विशाल काठे यांना एका सफारी कारमधून चौघे गावठी कट्ट्यासह हनुमानवाडी-जुना गंगापूरनाका रस्त्याने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत सूचित केले. वाघ यांनी तत्काळ चोपडा लॉन्सजवळच्या पुलालगत टी-पॉइंटवर सापळा रचला. यावेळी रामवाडीकडून एक सफारी कार (एमएच४३ एक्यू २७७२) येताना दिसली. पथकाने कारला थांबविले. कारचालक तनीश कैलास गुप्ता (रा. कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी) याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी एक पिस्तूलसह मॅगेझिनमध्ये जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल व नऊ लाख रुपयांची सफारी कार जप्त केली आहे. तनिशसह साथीदार मनाल खुशाल शिंदे (रा. वक्र तुंड अपार्टमेंट, म्हसरूळ), मोहन गणेश घुगे (रा. हिरावाडी, पंचवटी) या तिघांना अटक केली.

Web Title: In the car, the villagers were detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.