शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

सी. ई. टी.चे संकेतस्थळ शेवटच्या तारखेलाही बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

----------------------------------------------------------- ▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात ११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह ...

-----------------------------------------------------------

▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

देवगांव (तुकाराम रोकडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या ११वी प्रवेश प्रकियेसाठी सामाईक परीक्षेचे अर्ज करताना मंडळाच्या संकेतस्थळ बंदीमुळे ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संकेतस्थळाच्या अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा कमकुवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

दहावी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. परंतु कोरोना काळामध्ये शाळा भरली नसल्याने केवळ मूल्यांकनाच्या आधारावर दहावीचा निकाल राज्यांमध्ये लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणातून परिवर्तन करून आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, यंदा ही परिस्थिती अगदीच वेगळी आहे.

दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर सीईटी परीक्षा दिनांक २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी ११वी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने सामाईक परीक्षेचे अर्ज भरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली होती. पहिल्या दिवशी संकेतस्थळ सुरू असल्याने काही जागरूक पालक आपल्या पाल्याचे अर्ज करू शकले. मात्र, त्यानंतर शेवटची तारीख आली असतानाही अजूनपर्यंत संकेतस्थळ पूर्ववत चालू नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत. अर्ज भरण्यासाठी अजून अवधी मिळावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११वी परीक्षेसंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि. २० जुलै रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. २१ जुलैपासून बंद ठेवण्यात आली आहे, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

-----------------------

सीईटी परीक्षा अनिवार्य

जागतिक महामारी कोरोनामुळे शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने अंतर्गत मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने परीक्षेचे अर्ज सीईटीच्या संकेतस्थळावर भरावयाचे होते. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थीसंख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहे. मात्र, संकेतस्थळ बंद असून, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

--------------------------

इंटरनेट सुविधा कोलमडली

जवळपास शंभर टक्के निकाल लागलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक प्रवेशानुसार कला, वाणिज्य व विज्ञान तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि इतर पदविका अभ्यासक्रमाचे दरवाजे उघडे आहेत. परंतु, या सर्व गोष्टी करत असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंटरनेट सुविधा कोलमडलेली आहे.

-------------------------

मुदतवाढ ०२ ऑगस्टपर्यंत...

११वी प्रवेशाकरिता सामाईक परीक्षेसाठी ग्रामीण भागांतून संकेतस्थळाच्या अडचणीमुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाहीत. ११वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेमधून प्रवेश निश्चिती असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.