शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वारच चोरीस

By admin | Updated: October 19, 2014 00:52 IST

बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वारच चोरीस

 

वडाळागाव : घराचा दरवाजा तोडून चोरी करण्याचे प्रकार शहरात नवीन नाहीत; परंतु चोरट्यांच्या टोळीने एका बंगल्याचे तब्बल ५० किलो वजनाचे लोखंडी गेटच चोरून नेण्याचे धाडस केले आहे. विशेष म्हणजे, बंगल्यात सर्व कुटुंबीय हजर असताना चोरट्यांनी भले मोठे गेट उचकटून नेले. शुक्रवारी (दि. १७) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी गरीब नवाज कॉलनीमधील एका बंगल्याचे लोखंडी प्रवेशद्वार लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.येथील गरीब नवाज कॉलनीमध्ये राहणारे बाबुद्दीन शहाबुद्दीन खान यांच्या बंगल्याचे पन्नास ते साठ किलो वजनाच्या लोखंडी प्रवेशद्वारासह पाच जर्मन धातूची पातेली चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. नवरात्रोत्सवामध्ये चोरट्यांनी पोलीस चौकीच्या परिसरातील दोन दुकाने फोडून हजारो रुपयांचा माल चोरून नेण्याबरोबरच पोलीस चौकीच्या ओट्यावरील भंगार मालाच्या पिशव्याही लंपास करत पोलिसांना आव्हान दिले होते. या घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोच गरीब नवाज कॉलनीमधील एका बंगल्यामधून चोरट्यांनी भ्रमणध्वनी पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोपाळवाडीमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी विविध वस्तू व रक्कम हातोहात लंपास केली होती. या घटनांना काही दिवस होत नाही तोच वडाळा शिवारातील खोडेनगर भागात एका बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारून हजारो रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिनेही चोरून नेल्याची घटना घडली. खान यांनी तक्रार देण्यासाठी सकाळी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठले; मात्र पोलिसांनी रीतसर त्यांची फिर्याद लिहून घेण्याऐवजी ‘नाव-पत्ता लिहून द्या, आमचे कर्मचारी घरी येऊन तक्रार घेतील’ असा सल्ला देऊन समजूत काढली. (वार्ताहर)