शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढ : चाळीत कांदा शिल्लक नसल्याने सात हजारांचा टप्पा गाठण्याचे संकेत

By admin | Updated: August 21, 2015 00:45 IST

येवल्यात कांदा ५७०० रुपये क्विंटल

येवला : येवला मार्केट यार्डवर गुरुवारी ३५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याचे भाव ५७०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडे चाळीत केवळ एक लाख क्विंटल कांदा शिल्लक राहिल्याचा अंदाज आहे. शनिवारी सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल कांदा विकला गेला होता. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक वाढल्याने अर्थशास्त्रीय नियमाने कांदा भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत होते. हंगामातील हा सर्वोत्तम कांदा भाव आहे. कांदा सात हजारी गाठणार असल्याचा अंदाज आहे.येवला तालुक्यात सध्या २० टक्के कांदा ग्रामीण भागात चाळीत शिल्लक आहे. भाववाढीच्या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा ठेवला आहे. कांदा भावात तेजी वाढेल व आॅगस्ट महिन्यात चांगल्या प्रतीच्या कांद्याला पाच हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल बाजारभावाचा टप्पा गाठला जाईल, असा जाणकारांनी व्यक्त केला होता. हा अंदाज चुकवत कांदा ५७०० पयापर्यंत पोहचला. भारताची देशांतर्गत गरज ४५० लाख मेट्रिक टन म्हणजे प्रतिमहिना ३५ लाख मेट्रिक टन आहे. संपूर्ण उन्हाळ हंगामात ३० ते ४० लाख मेट्रिक टन साठवणूक झाल्याचा अंदाज आहे. मात्र आॅगस्ट ते आॅक्टोबर ८० ते ८५ लाख टन कांद्याची गरज आहे. म्हणजेच सुमारे ४५ ते ५० लाख टन कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. चांगला दिसणारा कांदादेखील १५ दिवसात चाळीत सडू लागला होता. तो कांदा शेतकऱ्यांनी यापूर्वीच मार्केटला विकला आहे. सध्या टिकणारा कांदा चाळीत आहे. परंतु शिल्लक कांद्यातून मोठी गरज भागली जाणार नाही. पाकिस्तानमध्ये कांद्याची मागणी वाढली आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर पाकिस्तानमध्ये ही टंचाई भासणार आहे. या पाशर््वभूमीवर भारतातून पाकिस्तानला कांदा निर्यात केला तरी फायदा आहे. दिल्लीत सध्याचा भाव ४५ ते ५० रुपये किलो आहे, आणि ५५ ते ६० रुपयांपर्यंत गेला तरी शेतकरी जगवायचा असल्यास त्याची अधिक ओरड होऊ नये ही अपेक्षा आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील कांदा सध्या ५७०० रुपये क्विंटल आहे. मुळात कांद्याचे उत्पन्न कमी असल्याने शिल्लक कांदा अधिक काळ पुरवता येणार नाही. यामुळे आॅगस्ट अखेरीस कांदा सात हजाराचा टप्पा गाठू शकतो, असा जाणकारांचा होरा आहे. यंदा केंद्राने कांदा आयातीचे भूत उभे करून भाव पडू नये, अशी अपेक्षा आहे. कांदा आवक व भाववाढ हा वेग लक्षात घेतला तर उन्हाळ कांदा शेतकऱ्याला परिणामकारक भाव देत आहे. भारताची देशांतर्गत गरज आणि केली गेलेली साठवणूक याच्या गणितानुसार मात्र आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात एकूण सुमारे ८० ते १०० लाख टन कांद्याची गरज आहे. आता पाऊस पडला तर नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये नवीन कांदा मार्केटला येण्याचा अंदाज आहे. सध्या शिल्लक असलेला उन्हाळ कांदा जेमतेम सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल. त्यापुढे आॅक्टोबरपर्यंत टंचाई निर्माण होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून कांद्याचे भाव चांगलेच तेजी गाठण्याची शक्यता आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळण्याची चिन्हे आहेत. २६ जूनपासून केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य ४२५ डॉलर प्रतिटन केले आहे व निर्यात अगोदरच रोखली आहे. सर्वसामान्य लोकांनीदेखील बळीराजाच्या हितासाठी कांदा भावाची अधिक ओरड करू नये, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)