शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

By admin | Updated: September 6, 2016 22:10 IST

ब्राह्मणवाडे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

 नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडेच्या सरपंच सुनंदा तबाजी वाघ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. नायगाव खोऱ्यातील ब्राह्मण-वाडेच्या सरपंचपदी सुनंदा वाघ यांची गेल्या वर्षी निवड करण्यात आली होती. वाघ या पदाचा गैरवापर करतात. मनमानी कारभार करतात, विकासकामांत अडथळा निर्माण करतात, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वास न घेता काम करतात. असे आरोप त्यांच्यावर करत आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. प्रस्तुत अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी व मतदान घेण्यासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सरपंच सुनंदा वाघ गैरहजर राहिल्या. उर्वरित सर्व आठ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा तहसीलदार खैरनार यांनी केली. उपसरपंच सुनील अर्जुन गिते, ग्रामपंचायत सदस्य भीमा गिते, संजय गिते, सुनील रामराजे, चंद्रभागा गिते, मंगल घुगे, शीतल रामराजे, मंदा माळी यांच्यासह ग्रामसेवक जी. आर. वटाणे उपस्थित होते. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मतभेद असल्याने अविश्वास प्रस्तावाकडे नायगाव खोऱ्याचे लक्ष लागून होते.राहिले होते.(वार्ताहर)