अपघातात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: April 10, 2017 22:33 IST2017-04-10T22:33:07+5:302017-04-10T22:33:07+5:30

शहरातील पंचवटी व ओझर येथील वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

Both of them died in an accident | अपघातात दोघांचा मृत्यू

अपघातात दोघांचा मृत्यू

नाशिक : शहरातील पंचवटी व ओझर येथील वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ पहिला अपघात मालेगाव स्टॅण्ड परिसरात घडला़ ट्रकने दिलेल्या धडकेत अरुण यशवंत पवार (रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) या दुचाकीस्वाराचा रविवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
दुसरा अपघात ओझरजवळील दीक्षीरोडवर झाला़ द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाने रविवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास महावितरणमधील कामगार राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीस धडक दिली़ यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them died in an accident