शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धवटस्थितीत आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 16:37 IST

एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील वॉचमनच्या लक्षात आले. त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली.

ठळक मुद्देमृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठविला. कोणीतरी खून करून युवकाला विहिरीत तर फेकून दिले नाही ना?

नाशिक : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगर भागातील एका पडीक विहिरीत अज्ञात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धवटस्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या व अर्धवट अवस्थेत असून शीर नसल्याने पोलिसांपुढे ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास येथील पेठेनगर रस्त्यालगत असलेल्या एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील वॉचमनच्या लक्षात आले. त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. मृतदेहाचे शीर नसल्यामुळे आणि मृतदेह किमान दोन महिन्यांपासून पाण्यात कुजल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या युवकाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचे हातदेखील नसल्याने कोणीतरी खून करून युवकाला विहिरीत तर फेकून दिले नाही ना? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. विहिरीत मृतदेह आढळून आल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी