शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वालदेवी धरणात बुडालेल्या पाच जणांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:57 IST

घोटी : वालदेवी धरणावर शुक्रवारी (दि.१६) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले नऊ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यात तिघे बचावले होते तर एका मुलीचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. उर्वरित पाच जण बेपत्ता होते. शनिवारी (दि.१७) राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवत पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला आहे. हे सर्व जण नाशिक शहरातील सिडको, पाथर्डी परिसरातील रहिवासी होते.

ठळक मुद्देएकूण सहा जणांचा बळी : पाच मुलींसह एका मुलाचा समावेश

घोटी : वालदेवी धरणावर शुक्रवारी (दि.१६) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले नऊ जण पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यात तिघे बचावले होते तर एका मुलीचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. उर्वरित पाच जण बेपत्ता होते. शनिवारी (दि.१७) राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवत पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे या दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला आहे. हे सर्व जण नाशिक शहरातील सिडको, पाथर्डी परिसरातील रहिवासी होते.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील सिंहस्थनगर, पाथर्डी फाटा या परिसरातील १० ते २२ या वयोगटातील मुले-मुली शुक्रवारी (दि.१६) सोनी रावसाहेब गमे (१२) हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबई - आग्रा महामार्गावर आठव्या मैलापासून ७ कि. मी. आत असलेल्या वालदेवी धरणावर गेले होते. वाढदिवस आटोपून संपूर्ण ग्रुपचे छायाचित्र घेण्यासाठी सर्वजण पाण्यामध्ये उतरले असता, त्यातील एका मुलीचा पाय घसरल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वच जण खोल खड्ड्यात पडले. त्यात सना वजीर मणियार, समाधान वाकळे व प्रदीप जाधव हे सुदैवाने बचावले. तर शोध पथकाने शुक्रवारी आरती भालेराव (२२) या मुलीचा मृतदेह बाहेर काढला होता. रात्री उशिरा अंधारामुळे अडथळा येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. शनिवारी सकाळी ६ वाजता धुळे येथून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या जवानांनी धरणात शोधकार्य सुरू केले असता, बुडालेल्या मुला-मुलींचा तासाभरात शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. धरणाचे पाणी संथ असल्याकारणाने बुडालेल्या ठिकाणाच्या २५ ते ३० फुटाच्या अंतरावरच पाचही मृतदेह सापडले. यामध्ये ४ मुली व एका मुलाचा समावेश आहे. हिम्मत ऊर्फ दिनेश राजेंद्र चौधरी(१६) नाजीया वजीर मणियार (१९) , खुशी वजीर मणियार (१०), ज्योती रावसाहेब गमे(१६) आणि सोनी गमे (१२) अशी मृतांची नावे असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता नाशिक येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मुलांचे मृतदेह पाहून त्यांच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी मदतकार्य करणाऱ्या स्थानिकांनाही शोक अनावर झाला.राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मोहीमधुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या बाबूराव पारस्कर व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार देवीदास फड, प्रवीण मोरे, श्याम सोनवणे, नीलेश मराठे, प्रवीण भोईर, विनोद चौधरी आदी मोहिमेत सहभागी झाले होते. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात